शिल्पा अग्रवाल ठरल्या 'मिसेस युनिव्हर्स लव्हली'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर - उद्योजिका शिल्पा अग्रवाल "मिसेस युनिव्हर्स लव्हली 2017' च्या मानकरी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या 184 महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला.

दरबान येथे 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या एकमात्र नागपूरकर आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या स्पर्धेत शिल्पा अग्रवाल यांनी विविध फेऱ्यांमध्ये स्वत:च्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. त्या "मिसेस युनिव्हर्स लव्हली' किताब पटकाविणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला आहेत. "महिला सक्षमीकरणातून परिवर्तनाचा उदय' अशी या स्पर्धेची थीम होती. स्पर्धेत 21 ते 45 वर्षे वयोगटातील 184 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात टीव्ही कलाकार, मॉडेल, समाजसेविका, उद्योजिका आदींचा समावेश होता.

Web Title: nagpur vidarbha news shilpa agarwal misses universe lovely