
Bribe News : हद्दच झाली! संप काळातही सरकारी अधिकाऱ्याची लाचखोरी सुरूच; नायब तहसीलदार अटकेत
जळगाव - जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी सातत्याने करत आहे. या संपामुळे सर्वसामान्यांचा खोळांबा झालाय. मात्र काही सरकारी अधिकारी संपकाळातही लाच घेत असल्याचं समोर आल आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूकीला अभय देण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना धरणगाव येथे कोतवाल आणि नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली. ही अटक गुरुवारी करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच कारण म्हणजे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तरी देखील संप काळात कोतवाल आणि तहसीलदारने लाच घेतल्याने संपावर टीका होत आहे.
धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागातील नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे याने तक्रारदारास डंपरने वाळू वाहतूक सुरू राहू देण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडे ३० हजारांची लाच मागितली होती. मात्र तडतोडीनंतर २५ हजार रुपयांता ठरलं होतं.
त्यानंतर वाळू व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी पथकासह कोतवालासह नायब तहसीलदारांना लाच घेताना अटक केली.