उपमुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत

Names of Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar are being discussed for the post of Deputy Chief Minister
Names of Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar are being discussed for the post of Deputy Chief MinisterNames of Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar are being discussed for the post of Deputy Chief Minister

मुंबई : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे कोण उपमुख्यमंत्री होणार असा प्रश्न चर्चेला जात आहे. अशात भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Names of Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar are being discussed for the post of Deputy Chief Minister)

आज ७.३० वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज फक्त त्यांचाच शपथविधी पार पडणार आहे. यानंतर बैठक घेऊन मंत्रिमंडळ ठरवले जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तेव्हापासूनच उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) कोण होणार, याची चर्चा सुरू झाली होती. उपमुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्याला येणार का? अशीही चर्चा सुरू झाली.

Names of Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar are being discussed for the post of Deputy Chief Minister
‘फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक की, शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र?’

अशात उपमुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तसेच गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

मात्र, उपमुख्यमंत्रीपद भाजपला (BJP) मिळते की मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच शिंदे गटाला मिळते हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद शिंदे गटाला भेटल्यास आश्चर्य वाटायला नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com