Nana Patole : 'राज्यातील पक्षांनी असं बोलणं म्हणजे...', नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole on NCP

'राज्यातील पक्षांनी असं बोलणं म्हणजे...', पटोलेंचा राष्ट्रवादीला टोला

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीत शरद पवारांना (Sharad Pawar) यूपीएचे अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आता त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) घमासान होणार असल्याचं दिसंत. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील राज्य पातळीवरील पक्ष म्हणत राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसचे २५ आमदार नाराज, सोनिया गांधींची घेणार भेट

यूपीएच्या अध्यक्ष पदाबाबत त्यांच्या पक्षात चर्चा असणं स्वाभाविक आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर विरोध करायचं काही कारण नाही. पण, या देशात भाजपच्या वाईट व्यवस्थेला फक्त काँग्रेसचं दूर करू शकत. त्यामुळे राज्य पातळीवरील पक्षाने असा विचार करणे म्हणजे पर्यायाने भाजपला मदत केली जाईल अशा पद्धतीचं चित्र आज देशामध्ये दिसतंय. काँग्रेसच देश पातळीवरील पक्ष आहे. ही भूमिका देशाच्या जनतेची आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवावी, असं नाना पटोले म्हणाले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची दिल्लीला बैठक पार पडली. यावेळी स्वतः शरद पवार देखील उपस्थित होते. सध्या देशात भाजपला आव्हान द्यायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी विरोधी आघाडी उभी करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरद पवारांकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवावं, असा ठराव बैठकीत मांडण्यात आला. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

काँग्रेस युपीएचं नेतृत्व करू शकत नाही. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवार पार पाडू शकतात, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी बैठकीत व्यक्त केला होता. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये घमासान होणार असल्याचं चित्र आहे.

Web Title: Nana Patol Jibe At Ncp Over Upa President Proposal Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..