देशात विष कालवून अखंड भारत कसा साकार होईल? नाना पटोलेंचा भागवतांना सवाल | Nana Patole Comment On Mohan Bhagwat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 nana patole

देशात विष कालवून अखंड भारत कसा साकार होईल? नाना पटोलेंचा भागवतांना सवाल

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अखंड भारत या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. केंद्रात संघ विचाराचे सरकार आल्यापासून देशात विष कालवून समाज तोडण्याचे काम चालू आहे. अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल, असा प्रश्न काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोहन भागवत यांच्यासह संघावर केला आहे. ते आज शुक्रवारी (ता.१५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी यांनी अखंड भारताबद्दल केलेल्या विधानाचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे पटोले म्हणाले. (Nana Patole Ask Mohan Bhagwat, How Possible Akhand Bharat)

हेही वाचा: ''दानवेंनी आरोप करण्यापेक्षा आम्हाला सरकार्य करावे''

संघाची विचारसरणी ही तोडणारी आहे. त्यातूनच सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रात संघाच्या विचारांचे सरकार असल्याने समाजात द्वेष पसरवण्यास बळ मिळत असल्याचे पटोले म्हणाले. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे व्हिजन काय ?

हेही वाचा: बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास

केंद्राकडून कोळसा पुरवठा होत नसल्याने राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे, असे पटोले म्हणाले. केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी परदेशातून कोळसा आणण्याचा सल्ला दिला आहे. तो आयात केल्यास त्याचा फायदा भाजपच्या काही उद्योगपतींच मिळेल. मात्र आयात कोळशामुळे वीज महाग होईल. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांनाच सोसावा लागेल, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: Nana Patole Ask Mohan Bhagwat How Possible Akhand Bharat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..