esakal | 'कोरोनामुळे काँग्रेसने बंगालची निवडणूक पूर्ण ताकदीने लढली नाही'

बोलून बातमी शोधा

nana patole
'कोरोनामुळे काँग्रेसने बंगालची निवडणूक पूर्ण ताकदीने लढली नाही'
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: देशातील पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिथं भाजपाने मोठी ताकद लावली होती पण तरीही ममतादीदींनी मोठी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे. सध्या ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन विजय निश्चित केला आहे.

याबद्दल बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. पटोले म्हणाले की, भाजपाला देशापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या होत्या, कारण देशात कोरोना वाढत असताना भाजपाने बाजार मांडला होता. तरी भाजपला पराभूत करण्याचे लोकांनी ठरवले होते त्यामूळे भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

हेही वाचा: संजय राऊत म्हणतात, बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय

कोरोनामुळे काँग्रेसने बंगालची निवडणूक पूर्ण ताकदीने लढली नाही. कारण आम्हाला निवडणुकांपेक्षा देश महत्त्वाचा होता, अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी दिली आहे.