Sanjay Raut News : राऊतांनी केलेलं वक्तव्य निषेधार्य, पण…; नाना पटोले स्पष्टच बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole On sanjay raut calling chormandal bjp demand to file infringement of rights maharashtra Politics

Sanjay Raut News : राऊतांनी केलेलं वक्तव्य निषेधार्य, पण…; नाना पटोले स्पष्टच बोलले

खासदार संजय राऊत यांनी राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांच्यांविरोधात शिंदे गट-भाजपाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली. यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्याच्या जनतेचा अपमान करण्याचा हक्क कोणालाही नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले की, गॅस दरवाढ, पंपाचं कनेक्शन कापणं, महागाई यावरून विरोधकांकडून हल्ला होणार आणि त्याचं उत्तर द्यावं लागेल म्हणून आजचा दिवस कसा मोडून काढता येईल यासाठ सत्तापक्ष भाजपने ही रणनिती केली होती.

संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्य आहे. त्याचं समर्थन करण्याचं काही कारण नाही. विधीमंडळाचाच नाही तर राज्याच्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही असेही काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले आहेत.

अध्यक्षांनी निर्णय घेऊन कारवाई करण्याचा अधिकार होता. भाजपच्या सदस्यांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा होता. सभागृहात त्याला कोणाचा विरोध नव्हता.

पण दिवसभर सभागृहाचं कामकाज ज्याप्रक्रारे तहकूब केलं हे जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टीचा प्रयत्न झाला आहे, असेही नाना पटोले म्हणाले. अध्यक्षांना अधिकार आहे त्यांनी निर्णय द्यावा पण जनतेचे प्रश्नही महत्वाचे आहेत त्यासाठी सभागृह चालू करावं असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

नेमकं काय झालं?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सभागृहात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून आज चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे असे सांगत येत्या दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे जाहीर केले.