'भाजपच्या विद्यमान आणि माजी कॅबिनेट मंत्र्यासह राज्यमंत्रीही कांग्रेसच्या संपर्कात'

'भाजपच्या विद्यमान आणि माजी कॅबिनेट मंत्र्यासह राज्यमंत्रीही कांग्रेसच्या संपर्कात'

गोंदिया : सध्याच्या घडीला कांग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते, आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असून या वर महाराष्ट्र कांग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांना प्रश्न केला असता निवडणूका लागतच भाजपला मोठा हातोडा बसणार असून भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट, राज्यमंत्री, नेते कांग्रेसच्या संपर्कात असल्याने लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा गोप्य स्फोट माजी खासदार तसेच काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे.

नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली असता त्यांनी आज गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली असून ते यावेळी बोलत होते.

गोंदिया जिल्ह्यात आतपर्यंत फक्त 5% शेतकऱ्याचे शेतीचे कामे झाली असून पाण्याअभावी 95 % शेतकऱ्यांची पेरणी न झाल्याने गोंदिया भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. गोंदिया भंडारा जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित झाला नाही तर लवकरच काँग्रेस मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहितीही  नाना पटोले यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com