नाणार प्रकल्प रेटल्यास मंत्रिपदाचा राजीनामा - सुभाष देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - नाणारप्रकरणी स्थानिक जनता शांततापूर्ण आंदोलन करत असून, त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. 

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. मात्र, हा विरोध झुगारत सोमवारी सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. 

नाणार प्रकल्पाचा सामंजस्य करार झाल्याचे आपल्याला माध्यमांतून कळाल्याचे देसाई यांनी सांगितले. केंद्र सरकारमध्ये अनंत गीते हे आमचे मंत्री आहेत. त्यांनाही याची कोणतीही कल्पना दिली नसल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. जनता शांततापूर्ण आंदोलन करत आहे; पण त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा सुभाष देसाई यांनी दिला. 

Web Title: Nanar Project issue subhash desai