नाणारला विरोध करणाऱ्यांची समजूत काढू - मुखमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - सरकारची भूमिका संघर्षाची नसून संवादाची आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार होणार असल्याचे संकेत आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत दिले. कोकणातील नाणार रिफानरीला विरोध करणाऱ्यांचे चर्चेतून गैरसमज दूर करू असे फडणवीस यांनी सांगितले. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्डाने आयोजित केलेल्या नैसर्गिक वायू निविदेबाबत आयोजित रोड शो दरम्यान फडणवीस यांनी नाणारवर भाष्य केले. नाणारला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पेट्रोलियम मंत्री धमेन्द्र प्रधान यांनी भेट नाकारली होती.

त्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. नाणारला विरोध करणाऱ्यांचे गैरसमज दूर केले जातील. उद्धव ठाकरे यांनी आज भेट नाकारली असली तरी पुन्हा त्यांची भेट घेऊन नाणारचे महत्व त्यांना पटवून देऊ असे प्रधान यांनी सांगितले. संघर्षाऐवजी संवादाला सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे संवादातून नाणारचा विरोध कमी करण्यावर भर देऊ असे त्यांनी सांगितले.

Web Title: nanar project oppose devendra fadnavise