नांदेड-पनवेल-नांदेड रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द; काही गाड्याही रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मध्य रेल्वेमध्ये सोलापूर ते वाडी विभागात वाडमिंगे ते भाळवणी स्थानकादरम्यान 35 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामातील रूळ जोडण्यात येणार आहेत. म्हणून ता. 16 ते ता. 27 ऑगस्ट या काळात नाॅन इंटरलॉक वर्कींग कामामुळे नांदेड- पनवेल- नांदेड काही अंशी रद्द करण्यात आली आहे. तसेच सोलापूर विभागातून देशभरात धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे. 
 

नांदेड : मध्य रेल्वेमध्ये सोलापूर ते वाडी विभागात वाडमिंगे ते भाळवणी स्थानकादरम्यान 35 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामातील रूळ जोडण्यात येणार आहेत. म्हणून ता. 16 ते ता. 27 ऑगस्ट या काळात नाॅन इंटरलॉक वर्कींग कामामुळे नांदेड- पनवेल- नांदेड काही अंशी रद्द करण्यात आली आहे. तसेच सोलापूर विभागातून देशभरात धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे. 

नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही ता. 21 ऑगस्ट, नांदेड ते सीएटी ता. 22 ऑगस्ट, पनवेल ते नांदेड ता. 17 आणि ता. 19 व  ता. 23 ऑगस्ट सहा फेऱ्या, नांदेड ते पनवेल ता. 16 आणि ता. 18 व ता. 22 ऑगस्ट सहा फेऱ्या, नागपूर ते कोल्हापूर (मार्गे परळी, पूर्णा, हिंगोली, वाशिम आणि अकोला) ता. 18 आणि ता. 22 ऑगस्ट, कोल्हापूर ते नागपूर ता. 19 व ता. 23 ऑगस्ट, पूणे ते अमरावती ता. 18 आणि ता. 23 ऑगस्ट, अमरावती ते पुणे ता. 19 व ता. 24 ऑगस्ट, निझामाबाद ते पंढरपूर ता. 16 ते ता. 23 ऑगस्ट, पंढरपूर ते निझामबाद ता. 17 ते ता. 24 ऑगस्ट ह्या गाड्या पुर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबई ते भूवनेश्‍वर ता. 17 ते ता. 23 ऑगस्ट मनमाड- औरंगाबाद- परळी- लातूर रोड मार्गे विकाराबाद, भुवनेश्‍वर ते मुंबई ता. 16 ते ता. 22 ऑगस्ट विकाराबाद- लातूर रोड- परळी, औरंगाबाद मार्गे मनमाड, मुंबई- हैद्राबाद  ता. 16 ते ता. 22 ऑगस्ट आणि हैद्राबाद ते मुंबई ता. 17 ते ता. 23 ऑगस्ट या मार्गावरून धावणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded-Panvel-Nanded trains canceled Some trains also canceled