हिंमत असेल तर... नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर पुन्हा प्रहार!

narayan rane
narayan raneesakal

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी आपल्या 'प्रहार' वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) निशाणा साधला आहे. आजच्या प्रहार (prahar) मध्ये नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात असं सदर छापून आलं आहे. नेमके काय म्हणाले नारायण राणे....

नारायण राणे यांचा घणाघाती प्रहार,

'प्रहार'च्या आजच्या अंकात याबाबत सांगितलं असून यात म्हटलं आहे की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीनं पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत आणि घणाघाती प्रहार, 'हार आणि प्रहार', उद्याच्या अंकात वाचा, असं प्रहारमध्ये म्हटलं आहे.

narayan rane
तीन वर्षात २०० हून अधिक विमानतळांचे नेटवर्क होणार - PM मोदी

'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा'

आजच्या प्रहारमध्ये देखील 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात असं सदर छापून आलं आहे. प्रहार पेपरच्या पहिल्या पानावर हा मथळा छापला गेलाय. गुरुवारच्या प्रहार पेपरच्या अंकात 'हार आणि प्रहार' या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष्य करणार आहेत.

narayan rane
मुंडे भगिनी दिल्लीत नितीन गडकरींच्या भेटीला; चर्चा सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com