...तर सरकार मराठा आरक्षणावर विचार करेल : नारायण राणे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, संजय राऊत यांना मुख्यमंत्री बदलावर भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला ? असा प्रश्न उपस्थित केला. 

मुंबई : ''राज्यातील आंदोलन थांबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन आहे. मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन थांबल्यास सरकार यावर तातडीने विचार करेल'', अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केली. तसेच ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो, मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मध्यस्थी करणार आहे. आंदोलकांनीही तुटेपर्यंत ताणू नये. 

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी आरक्षणावर सरकारची भूमिका काय आहे, याची माहिती दिली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो. मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मध्यस्थी करणार आहे. आंदोलकांनीही तुटेपर्यंत ताणू नये. 
तोडफोड, जाळपोळीसारख्या हिंसक आंदोलनामुळे राज्याचेच नुकसान होत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या प्रश्नावर ते म्हणाले, या चर्चेत मी पडणार नाही. माझा विषय मराठा आरक्षणापुरता मर्यादित आहे. इतर कोणत्याही राजकारणात मी पडणार नाही.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, संजय राऊत यांना मुख्यमंत्री बदलावर भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला ? असा प्रश्न उपस्थित केला. 

Web Title: Narayan Rane on Maratha Reservation Issue