भाजपला मोठा झटका; नारायण राणे सोडणार साथ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू असताना भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेते नारायण राणे देणार भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू असताना भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेते नारायण राणे देणार भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राणे आगामी विधानसभा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षच्या माध्यमातून लढवणार आहेत. राणेंचा पक्ष बाहेरून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याच संदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी नारायण राणे यांची रविवारी भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत युती झाल्यानंतर राणेंना मुख्यमंत्र्यांनी साईड ट्रॅक केल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. लवकरच या गोष्टीची नारायण राणे घोषणा करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane may resign as a Rajysabha MP