नारायण राणे-भुजबळ  भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये या दोन माजी शिवसैनिकांची भेट झाली. दोघांच्या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

मनी लाँडरिंग आणि बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावरून छगन भुजबळ दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळ यांची जामिनावर सुटका केली होती. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणेंनी आज प्रथमच त्यांची भेट घेतली. या भेटीत राणेंनी भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचेही समजते.

Web Title: Narayan Rane meet Chhagan Bhujbal