नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार?

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करणार आहेत, असे संकेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी नारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नारायण राणे यांनी मागील वर्षी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक होते. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यावर कडाडून विरोध केला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्यात आले. 

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Narayan Rane Might be go with Congress again