भाजपने शब्द न पाळल्याने नारायण राणेंची 'राष्ट्रवादी'शी जवळीक? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

राणे यांनी पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक केल्यास कॉंग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत कॉंग्रेस नेत्यांनी बोलण्यास नकार दिला. 

मुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी "राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या मदतीने राज्यसभेत जाण्याची संधी राणे यांना मिळाली; मात्र त्यानंतर भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याची त्यांची भावना झाल्याचे "राष्ट्रवादी'च्या सूत्रांनी सांगितले. 

राणे यांनी कॉंग्रेससोबत फारकत घेतलेली असली, तरी राष्ट्रवादीसोबत युती करावी, त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेची जागा द्यावी, यावर राष्ट्रवादीत सहमती असल्याचे समजते. 

राणे यांनी पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक केल्यास कॉंग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत कॉंग्रेस नेत्यांनी बोलण्यास नकार दिला. 

Web Title: Narayan Rane with NCP with BJP not following the word