esakal | नाशिक पोलिसांकडे नारायण राणे देणार ऑनलाईन जबाब
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक पोलिसांकडे नारायण राणे देणार ऑनलाईन जबाब

नाशिक पोलिसांकडे नारायण राणे देणार ऑनलाईन जबाब

sakal_logo
By
नामदेव कुंभार

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आक्षेपार्ह टिपण्णी प्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात विविध शहरांत गुन्हे दाखल झाले होते. राणे यांच्यावर नाशिकमध्ये सर्वात आधी गुन्हा दाखल झाला होता. राणे यांना या प्रकरणी नाशिक पोलिसा हजर राहायचं आहे. मात्र, याबाबत आपण ऑनलाइन जबाब नोंदवू असे राणे यांनी नाशिक पोलिसांना कळविले आहे. 25 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांना नाशिक पोलिसांत हजर राहायचं आहे. तशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. याप्रकणी आपला ऑनलाइन जबाब नोंदवावा असं राणे यांनी विनंती केली आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रीयेचे अतिशय काटेकोर पालन करत अटकेची प्रक्रीया पूर्ण केली होती. पण रत्नागिरी पोलिसांनी याच प्रकरणात राणेंना ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यामुळे राणेंना अटक करण्यासाठी गेलेले नाशिक पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले होते. यावेळी नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना जबाब देण्यास हजर राहण्याची नोटीस बजावली होती. यासंदर्भात राणे यांनी आज पोलिसांना यासंदर्भात कळविले आहे. २ सप्टेंबर रोजी नाशिकला हजर राहायचे होते मात्र, उच्च न्यायालयाने १७ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिल्याने आता २५ सप्टेंबर रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहू. असे कळविल्याचे पत्र केंद्रीय मंत्री राणे यांनी पाठविल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे

हेही वाचा: रोहित पवार उभारतायत देशातला सर्वात उंच 'स्वराज्य ध्वज'

२४ ऑगस्ट रोजी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंची तक्रार केली होती.

loading image
go to top