Narayan Rane : कोकणातील ठाकरेंच्या सभेला स्थानिक लोक नव्हतेच; नारायण राणेंचा मोठा दावा | There were no local people in Thackeray's meeting in Konkan; claim of Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane and Uddhav Thackeray

Narayan Rane : कोकणातील ठाकरेंच्या सभेला स्थानिक लोक नव्हतेच; नारायण राणेंचा मोठा दावा

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात सभा घेतली होती. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेत त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच ठाकरेंवर जोरदार टीका केली.

नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेच्या सभा जाहीर व्हायच्या. उद्धव ठाकरेंची सभा अरेंज केलेली होती. सभेत खुर्च्या दूर-दूर लावल्या होत्या. विराट मेळावा दाखविण्याचा प्रयत्न केला. या सभेला स्थानिक लोक नव्हते. उद्धव ठाकरेंना काय बोलता येतं. जनतेच्या प्रश्नाबद्दल काहीही माहित नाही. अडीच वर्षात काही केलं नाही. त्यांनी कोकणाला काय दिलं असा सवाल राणे यांनी केला.

अडीच वर्षात मंत्रालयात गेले नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहे. निवडणुकीत आता १५ ही त्यांच्यासोबत राहणार नाही. मंत्रालयात यायची त्यांची ताकद नव्हती. ते महाराष्ट्र पिंजून काढणार का? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरले तरी काहीही फरक पडत नाही, असं राणे यांनी म्हटलं

दरम्यान महाविकास आघाडी जनतेच्या मनातून उतरलेली आहे. भास्कर जाधवांचा नाच पाहिला आहे. तो नाच महाराष्ट्रातील लोकांना अभिप्रेत नाही. उद्धवला सांगा स्वत: जीभ सांभाळ, अशी सडकून टीकाही राणे यांनी केली.