जालन्यातच होता बॉंबनिर्मितीचा अड्डा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - हिंदुत्वाच्या आड येणाऱ्या विचारवंतांच्या हत्या करण्याचा मनसुबा कट्टर हिंदुत्ववाद्यांचा होता. वीरेंद्र तावडे हा हत्यांमागील मास्टरमाइंड असून, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शरद कळसकर, सचिन अंदुरे तसेच गोरी लंकेश यांच्या हत्येतील अमोल काळेसह तीन संशयितांनी जालन्यातील फार्म हाउसवर गोळीबाराचे प्रशिक्षण घेतले. याच ठिकाणी बॉंब निर्मिती करण्यात आल्याचा दावाही मुंबईतील सूत्रांनी केला आहे. 

नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी जालना येथील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला अटक झाली. यानंतर त्याच्याकडून पोलिस कोठडीदरम्यान मोठी माहिती एटीएसच्या हाती लागली. यात जालना येथील खुशालसिंग राणा ठाकूर याच्या फार्म हाउसवर गोळीबाराचे प्रशिक्षण घेतल्याचे व तेथे बॉंब निर्मिती केल्याची बाब चौकशीतून समोर आली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने जालना येथील रेवगाव-राजूर रस्त्यावरील विस्तीर्ण 22 एकर जागेतील फार्म हाउसवर छापा घातला. सुमारे चार तास चौकशी झाल्यानंतर पथक माघारी फिरले. मुंबईतील सूत्रांनी माहिती दिली की, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे व गौरी लंकेश हत्येतील संशयित अमोल काळे यांनी येथे गोळीबाराचे प्रशिक्षण घेतले. विशेषत: श्रीकांत पांगारकर याने या सरावासाठी आर्थिक रसद पुरविली. 

वीरेंद्र तावडेशी लिंकिंग  
विचारवंतांच्या हत्येतील मास्टरमाइंड वीरेंद्र तावडेच असल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोचल्या आहेत. त्याच्या संपर्कात कळसकर, गोंधळेकर, काळे, अंदुरे आल्याचे पुरावेही तपास यंत्रणेकडे आले आहेत. यातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलिस पोचत आहेत. 

अमोलनेही घेतले प्रशिक्षण 
गौरी लंकेश हत्येतील संशयित अमोल काळे हा जालना येथे येऊन गेल्याच्या माहितीवर तपास यंत्रणांकडून शिक्कामोर्तब झाले आहे. गौरी यांच्या हत्येपूर्वी अमोल काळे जालन्यात येऊन गेला व त्याच्यासोबतच अन्य दोन संशयितांनीही जालन्यात प्रशिक्षण घेतले. त्याची सचिन अंदुरे व शरद कळसकर याच्याशी चांगली ओळख आहे. 

कट्टर हिंदुत्वाचे वेड 
शरद कळसकर, सचिन अंदुरे, अमोल काळे, सुधन्वा गोंधळेकर हे एकमेकांशी परिचित असून, सर्व प्रकरणांतील संशयित हिंदुत्ववादी संघटनांशी जोडले गेलेले तर काही स्वतंत्र पातळीवर कार्य करीत होते. हिंदूंविरोधी बोलणाऱ्यांना संपविण्याचा त्यांचा इरादाच होता, हेही तपास यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Narendra Dabholkar and Gauri Lankesh killing case