आरोपी नक्की हेच काय?

High-Court-Mumbai
High-Court-Mumbai

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आता अटक केलेले आरोपी तरी नक्की दाभोलकर हत्येचे आरोपी आहेत ना? याची खात्री करून घ्या; अन्यथा खरे आरोपी बाहेर मोकाटच राहतील, या शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी तपास यंत्रणेला खडसावले. त्याच वेळी दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती प्रसिद्धिमाध्यमांना देणाऱ्या तपास अधिकाऱ्यांची, तसेच माध्यमांकडे बोलत असलेल्या दाभोलकर, पानसरे कुटुंबीयांचीही खंडपीठाने हजेरी घेतली.

डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात तपास यंत्रणेविरोधात दोन्ही कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. दाभोलकर प्रकरणी सीबीआय आणि पानसरेप्रकरणी एसआयटीने तपासाचा प्रगती अहवाल या वेळी सादर केला. "दाभोलकर प्रकरणात आता अटकसत्र सुरू झाले आहे; परंतु या लोकांना अटक होण्याआधी आजवर जी नावे समोर आली होती त्यांचे पुढे काय झाले?' असा सवालच खंडपीठाने सीबीआयला केला. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. बी. पी. कुलाबावाला म्हणाले, की कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणे पसंत नाही.

याबद्दल एका खंडपीठाने अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका' या शब्दांत त्यांनी दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनाही सुनावले.

दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. एटीएसच्या ताब्यातील काही आरोपींची कोठडीही सीबीआयने मिळवली आहे, अशी माहिती माहिती अहवालात देण्यात आली; मात्र एकंदरीत या संदर्भात दररोज माध्यमांत येणाऱ्या सखोल माहितीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती, पुरावे जाहीर करताना खबरदारी घ्यावी. तपासावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या, असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 10 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब केली.

एटीएसचा तपास स्वतंत्र
सीबीआयच्या ताब्यातील काही आरोपींना पानसरे प्रकरणात चौकशीसाठी कालांतराने ताब्यात घेणार आहोत, अशी माहिती एटीएसच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी उच्च न्यायालयात दिली. त्यावर इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका. तुमचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, अशी सूचना न्यायालयाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com