सचिन अंदुरेचे फेसबुक अकाउंट केले बंद

मनोज साखरे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सचिन फेसबुकवर स्फोटक वक्तव्य पोस्ट करीत होता. कट्टर हिंदुत्वाच्या समर्थनार्थ तो सतत लिखाण करीत होता. सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्तर राजकीय नेते आणि पक्षविरोधी लिखाण तो करीत होता. 

औरंगाबाद : सीबीआयच्या ताब्यात असलेल्या सचिन अंदुरेचे फेसबुक अकाउंट डीअॅक्टिव्ह करण्यात आले आहे. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून ही कार्यवाही करण्यात आल्याची बाब सूत्रांनी दिली आहे.

सचिन फेसबुकवर स्फोटक वक्तव्य पोस्ट करीत होता. कट्टर हिंदुत्वाच्या समर्थनार्थ तो सतत लिखाण करीत होता. सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्तर राजकीय नेते आणि पक्षविरोधी लिखाण तो करीत होता. 

फेसबुकवर त्याचे अकाउंट रविवारी पहाटे दोनपर्यंत दिसत होते. पण नंतर ते डीअॅक्टिव्ह केले गेले असून ते तपास यंत्रणाच्या सूचनेनुसार केले गेले असावे. अशी सूत्रांनी माहिती दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Narendra Dabholkar Sachin Andures Facebook account closed

टॅग्स