56 इंच छाती आलोक वर्मांसमोर का घाबरली? - भुजबळ

रविंद्र खरात
सोमवार, 14 जानेवारी 2019

कल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी असणार असून, बाबासाहेबांचा कायदा मोडू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. देवापासून सर्व सामान्य नागरिकांचे गोत्र काढणाऱ्या भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ द्या त्यासाठी घरी बसवा, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कल्याण पूर्व मधील जाहीर सभेत केले. 

कल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी असणार असून, बाबासाहेबांचा कायदा मोडू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. देवापासून सर्व सामान्य नागरिकांचे गोत्र काढणाऱ्या भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ द्या त्यासाठी घरी बसवा, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कल्याण पूर्व मधील जाहीर सभेत केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाची सभा आज (सोमवार) कल्याण पूर्व मधील चक्की नाका परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, चित्रा वाघ, फोजिया खान, प्रमोद हिंदुराव, जगनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मोदी आणि राज्य सरकारवर चौफेर टिका केली.

आपल्या भाषणात भुजबळ म्हणाले, विकास कुठे गेला गल्ली पासून दिल्ली पर्यत शहर आणि गाव यांची वाट लागली आहे. कल्याण डोंबिवली कराना दिलेले आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. विकासाच्या नावावर निवडूक जिंकल्या ते लोक आज राममंदिरावर पुन्हा चर्चा करत आहेत. देशाचा तिरंगा फडकला पाहिजे मात्र सध्या त्याचा उपयोग देशाच्या शहीद जवानाच्या कफनासाठी उपयोग केला जात आहे कुठे गेल्या घोषणा, देशात अराजकता माजली की जनता आपला आवाजाकडे सरकार ने लक्ष्य वेधावे यासाठी मंत्रालय मध्ये आत्महत्या करत आहेत. मात्र सर्वांचे आवाज दाबण्याचा प्रयन्त केला जात आहे, मग 56 इंच छाती अलोक वर्मांसमोर का घाबरली असा सवाल करत मला का पकडले त्यांना ही आणि मला ही समजले नाही, आगामी निवडणूकीमध्ये घोषणा करून चालणार नाही न दादागिरी.

आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध संविधान अशी असणार असून बाबासाहेबांचा कायदा तोडू मोडू पाहणाऱ्या धडा शिकवा असे आवाहन करत भुजबळ म्हणाले, की इंदिरा गांधीच्या आणी बाणी पेक्षा मोदींची महा आणीबाणी असून धर्माच्या जातीच्या नावाने राजकारण करणाऱ्याना घरी बसवा असे, आवाहन भुजबळ यांनी केले.

यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्यातील मंत्री मंडळात अनेक बोगस पदवी असणारे मंत्री असून डोंबिवली मधील दहावी शिकलेले रविंद्र चव्हाण यांना कोणते खाते दिले असा सवाल करत असे मंत्री असतील तर शहराचा काय राज्याचा विकास होणार असा पवार यांनी सवाल करत पुढे म्हणाले की विकास ऐवजी गोत्राचे भाषा करत समाजात दुही निर्माण काम करण्याचे काम सध्या भाजप सेनावाले करत असून दोघे लढण्याचे दाखवत जनतेला फसवीत असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला. यापूर्वी दूषित वातावरण जनतेने पाहिले नाही देशपातळी ते शहर पातळीवर केंद्र आणि राज्य सरकार कशे अपयशी ठरले यावर आढावा घेत पवार म्हणाले  की दोन समाजात दुफळी निर्माण करायचे गोत्राची चर्चा अश्या करून जनतेला किती दिवस फसवाल? यापूर्वी आमचे देशाचा आणि राज्याच्या विकासाच्या घोषणा केवळ घोषणा राहिल्या असून आमचे नेते शरद पवारांसारखे राज्यकर्ते कुठे आणि गाजरे दाखवणारे आताचे राज्यकर्ते कुठे? जनतेच्या शॉर्ट मेमरीचा फायदा सेना भाजपवाले घेतअसून त्यांना धडा शिकविण्याची वेळ असल्याचे मत पवार यांनी सांगत म्हणाले की, बेस्ट संपाला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याची टीका ही पवार यांनी केली. 

यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार वर टीका करत कल्याण डोंबिवली शहरातील समस्या पाडा वाचत कार्यकर्त्यांची मने जिंकली.

शिवसेना भाजपा युतीच्या बालेकिल्ल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची सभा कशी होणार याकडे लक्ष्य लागले होते. नेत्यांनी गल्ली ते राज्य आणि देश पातळी वरील विषय मांडत कार्यकर्त्यांची मने जिंकली मात्र ते ऐकण्यासाठी खाली खुर्च्या होत्या. सभा ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली मात्र सर्व सामान्य नागरिकांनी पाठ फिरवली होती . मैदानात गर्दी नसल्याने सभा एक ते दीड तास उशिरा सुरू झाली तर सभा उशिरा सुरू होताच एक एक नेत्यांची भाषणे संपताच काही महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतल्याने मैदान मधील खुर्च्या खाली झाल्या होत्या.

Web Title: Narendra Modi Alok Verma Chhagan Bhujbal Politics