Narendra Modi : तावडेंमुळे मोदींची मुंबईत झाली होती लाँचिंग; कमळातून अवतरले होते

एकेकाळी नरेंद्र मोदी यांना लाँच करणारे तावडे कुठंच दिसत नाहीत.
Narendra Modi
Narendra ModiSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. त्याआधी ते विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तर त्यासाठी भाजप नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ढोल ताशा, गाण्यांचा कार्यक्रम आणि लेझीमच्य कार्यक्रमांनी मुंबई दणाणून गेली आहे.

पण त्यांची मुंबईत जाहीर सभेची ही पहिलीच वेळ नाही. २००३ साली भाजप नेते विनोद तावडे यांच्या कृपेने पहिल्यांदा मुंबईत नरेंद्र मोदी यांची लाँचिंग झाली होती. पण तेच तावडे आजच्या सभेसाठी कुठेच दिसत नाहीत.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

नरेंद्र मोदी यांची २००१ मध्ये पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर त्यांच्यातील नेतृत्वगुण पाहून भाजपने त्यांना राष्ट्रीय पातळीवर लाँच करायचं ठरवलं होतं. तेव्हा विनोद तावडे हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. त्यांच्या कृपने नरेंद्र मोदी यांना मुंबईत लाँच केलं गेलं. यावेळी भल्यामोठ्या कमळातून त्यांना वर काढलं गेलं होतं.

मोदींना भल्यामोठ्या कमळातून वर काढण्यासाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सेट बनवला होता. या सेटची माध्यमांत मोठी चर्चा झाली. या सभेनंतर दोन दिवसांनी नरेंद्र मोदी यांनी नितीन देसाई यांना स्वत: फोन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि पुढच्या काळात त्यांना अनेक कामाच्या संधी दिल्या. तर नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा फेमस करण्याचं काम विनोद तावडे यांच्या कृपेमुळं झालं होतं.

Narendra Modi
Abdul Sattar : सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द बोलणारे सत्तार बारामतीत अन्...

ही नरेंद्र मोदी यांची मुंबईतील पहिलीच सभा होती. त्यानंतर आजपर्यंत मोदींच्या कित्येक सभा मुंबईत झाल्या पण आजच्या सभेत भाजपचे नेते विनोद तावडे यांचा मागमूसही दिसला नाही. एकेकाळी मोदींना लाँच करणारा नेता आज कुठेच कसा दिसत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

२०१४ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. या सरकारच्या काळात विनोद तावडे यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद मिळालं होतं. पण त्यानंतर त्यांना राज्याच्या राजकारणातून पद्धतशीरपणे बाजूला सारत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदली करण्यात आली.

महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यासुद्धा सध्या सक्रिय राजकारणापासून दुरावल्या गेल्या आहेत. तर त्या भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तावडेही राज्याच्या राजकारणातून दूर गेले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना महाराष्ट्रात लाँच केलेले तावडे आज मोदींच्या सभेला नव्हते हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com