शाळाशाळांत 'नमो कॅम्पिनिंग'; मोदींवरील लघुपट दाखवा 

Narendra Modi
Narendra Modi

सातारा : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने आता "मोदी एक्‍स्प्रेस' सुसाट धावू लागली आहे. त्याचा प्रचार म्हणून की काय आता शाळाशाळांत "नमो कॅम्पिनिंग' केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील 'चलो जीते हैं' हा लघुपट सर्व शाळांत मंगळवारी (ता. 18) दाखवावा, अशा सूचना विभागीय आयुक्‍तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित "चलो जीते हैं'' हा लघुचित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा 30 मिनिटाच्या लघुचित्रपटाचे प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे करण्यात येणार आहे. आपल्या विभागातील सर्व शाळांमध्ये येत्या मंगळवारी सकाळी 10 आणि दुपारी 3 या वेळेत प्रक्षेपित केला जाणार आहे. आपल्या विभागातील सर्व शाळांमध्ये तो विद्यार्थ्यांना दाखविला जावा, अशा सूचना मंत्रालयातून आयुक्‍तांना दिल्या असून, पुणे विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबंधित मॅसेज व्हॉटसअप्‌द्वारे दिला आहे. 

यासाठी लॅपटॉप अथवा डेस्कटॉप कॉम्पुटर, कमीत कमी एक एमबीपीएस इंटरनेटचा स्पीड, प्रोजेक्‍टर आणि स्क्रीन, साऊंड सिस्टिम आदी सुविधा शाळांनी उपलब्ध कराव्यात, अशा सूचनाही शिक्षण विभागाने शिक्षकांना पाठविल्या आहेत. हा लघुचित्रपट जास्तीत जास्त मुलांनी बघावा, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही सीईओंना दिल्या आहेत. 

लोकसभा निवडणूका फेब्रुवारीपर्यंत अथवा डिसेंबरमध्ये लागण्याची दाट शक्‍यता आहे. या लघुचित्रपटात पंतप्रधान मोदी यांचा जीवनपट उलघडला जाणार असल्याने "नमो कॅम्पिनिंग' केले जाणार आहे. सध्या नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात'ला प्रतिसाद थंडावला असून, आगामी निवडणुकांत भारतीय जनता पक्षाकडून तळागळात प्रचार करण्यासाठी नवनवीन शक्‍कल लढविली जात आहेत, अशीच चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com