मोदींनी पदाची शोभा राखली पाहिजे : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला यश मिळाले होते. तर, भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपला तेलंगणा आणि मिझोराममध्येही अपयश मिळाले होते. त्यामुळे विरोधी पक्षांकडून भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. शरद पवार यांनीही भाजपच्या कारभारावर जोरदार टीका करत मोदींवरही टीकास्त्र सोडले आहे.

शरद पवार म्हणाले, की मोदींबद्दल लोकांची नाराजी मतांमधून व्यक्त झाली. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत यावे. स्वायत्त संस्थांवर झालेला हल्ला लोकांना पटला नाही. देशात सध्या काळजी करण्यासारखे वातावरण आहे. भाजप सरकारच्या कामाबद्दल जनता नाराज आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली आश्वासने काही पूर्ण केलेली नाहीत. एका कुटुंबाविरुद्ध त्यांनी सतत प्रचार केला. त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींना पाहिले नाही. फक्त गेल्या दहा वर्षांच्या कामावर सतत टीका केली. त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना लक्ष्य केले. ते लोकांना पटले नाही.

Web Title: Narendra Modi Should Respect there post says Sharad Pawar