Ajit Pawar: ...तर त्यांनी अजितदादांचे पुतळे जाळायला का सांगितलं? पहाटेचा शपथविधी पुन्हा वादात

नरेश म्हस्के यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत खळबळजनक आरोप राष्ट्रवादी नेत्यांवर केले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar

मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारारार्थ अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरें चिंचवड मतदारसंघात उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. गद्दारी करून आलेलं हे सरकार असून आता यांची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशार अजित पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आणत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. (Naresh Mhaske NCP Sharad Pawar Devendra Fadnavis And Ajit Pawar Morning Swearing )

नरेश म्हस्के यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत खळबळजनक आरोप राष्ट्रवादी नेत्यांवर केले आहेत.

काय म्हणाले नरेश म्हस्के?

अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणावं, अजित पवार 23 नोव्हेंबर 2019 ची सकाळ विसरले वाटतं. अजित पवार दात न घासता शपथविधी करता गेले होते, असं त्यांच्याच एका नेत्याने मला सांगितलं.

आम्ही केली ती गद्दारी मग तुम्ही सकाळचा शपथविधी केलात ती गद्दारी नव्हती का? आपले काका शरद पवारांविरोधातला तो उठाव होता का? याचं स्पष्टीकरण त्यांनी द्याव. अशी मागणीही म्हस्के यांवी केला.

त्यांनी अजितदादांचे पुतळे जाळायला का सांगितलं?

तुमच्या ठाण्यातल्या नेत्यांनी आम्हाला फोन केले होते, अजितदादांचे पुतळे जाळा. अजितदादा पवार साहेबांच्या ते जवळचे आहेत. जवळचा मुलगा वगैरे ते स्वत:ला म्हणतात. नेत्यांनी आम्हाला फोन केले होते, अजितदादांचे पुतळे जाळा. तुम्ही गद्दारी केली नव्हती, तर त्यांनी आम्हाला पुतळे जाळायला का सांगितलं?असा सवाल नरेश म्हस्के उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती कशी झाली? तुम्ही काँग्रेसमध्ये होतात. पवार साहेबांनी संगमा साहेबांनी लोकसभा अध्यक्षाला पत्र लिहिलं. तुमची निर्मितीही काँग्रेसमधून बाहेर पडून झाली. तुम्ही आम्हाला गद्दारी म्हणत असाल तर राष्ट्रवादीची निर्मितीही गद्दारीतून झाली आहे. अजितदादांनी पहाटेचा शपथविधी गद्दारी होती का उठाव होता, याचं उत्तर द्या,' असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com