नाशिक विमानतळावर पर्यटन माहितीचे केंद्र सुरू करा - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर - ओझर (नाशिक) येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. या विमानतळावर पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनाची माहिती मिळावी. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भुजबळ म्हणाले, की महाराष्ट्रातील पर्यटनाबाबत माहिती मिळावी म्हणून विमानतळ टर्मिनलवर जागा राखीव ठेवलेली होती. याठिकाणी पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्याचे प्रास्तावित होते. महामंडळाच्या पर्यटन निवासाचे आरक्षण आदी योजना केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. त्यातून महामंडळाच्या महसुलामध्ये भर पडेल. राज्याच्या पर्यटनात वाढ होईल. मात्र, केंद्रासाठी राखीव ठेवलेली जागा महामंडळाच्या ताब्यात मिळालेली नाही.

'व्हिजिट महाराष्ट्र म्हणून 2018 हे वर्ष आपण साजरे करीत आहोत. जगभरातील पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना भेट द्यावी, यासाठीचा हा प्रयत्न असताना पर्यटनाकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही बाब खेदाची आहे. विमानतळावर माहिती केंद्राद्वारे पर्यटकांना माहितीची उपलब्ध करून देण्यातून विमानाने प्रवास करणारे पाच ते दहा टक्के पर्यटक लाभ घेऊ शकतात.''
- छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री)

Web Title: nashik airport tourist information center chhagan bhujbal