Shubhangi Patil : शुभांगी पाटलांचा मतदान केंद्रावरच प्रचार? पुढे काय झालं? Nashik graduate constituency elections Shubhangi Patil campaign at the polling station itself What happened next see video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubhangi Patil

Shubhangi Patil : शुभांगी पाटलांचा मतदान केंद्रावरच प्रचार? पुढे काय झालं?

Nashik graduate constituency elections : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान आज पार पडणार आहे. या निवडणूकीत चुरशीची होणार हे ठरलेलच आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे काँग्रेसचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ही मतदारांशी गाठी भेठी घेवून चांगला जनसंपर्क मतदार संघात वाढवल्याचे पाहिला मिळत आहे.

पदवीधर निवडणूकीसाठी आज मतदान पार पडलं. यावेळी संगमनेर येथे मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा आक्षेप घेत निवडणूक आयोगाने उमेदवार शुभांगी पाटील यांना सुनावलं. मतदान सुरू असताना त्या मतदारांजवळ जाऊन हात जोडत होत्या. त्यांच्या या हात जोडण्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना हात जोडू नका असं सांगितल.

ते म्हणाले हे काही ग्रामपंचायत निवडणुका नाहीत. संगमनेर मतदान केंद्रावर हा सर्व प्रकार घडला. इथे प्रचार करू नका इथे गर्दी करू नका. केंद्रात हा प्रकार चालत नाही. 100 मिटरच्या आतमध्ये प्रचार करता येत नाही असं तेथील अधिकाऱ्याने शुभांगी पाटलांना सांगितलं.

टॅग्स :election