भुजबळांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

भुजबळांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि संविधानमधील कलम 21च्या आधारे शुक्रवारी न्यायालयात बाजू मांडण्यात आली. न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 28) ठेवली आहे, अशी माहिती भुजबळ यांचे वकील सजल यादव यांनी दिली.

यादव म्हणाले की, करचुकवेगिरी कायद्यातील कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने "पीएमएलए' न्यायालयाने आज सुनावणी ठेवली. यापूर्वी दोनदा मुंबई उच्च न्यायालयाने आणि एकदा "पीएमएलए' न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. कलम 45 घटनाबाह्य ठरवले असल्याने जामीन मिळायला हवा, अशी बाजू मांडत असताना सर्वोच्च न्यायालयाने आणखी एका प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला जामिनाचा विषय आठवडाभरात संपवावा, या दिलेल्या आदेशाची बाब न्यायालयापुढे ठेवण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com