बंदी झुगारून चांदगिरीत घोडा-बैलांची टांगा शर्यत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नाशिक - बैलगाड्या-टांग्यांची शर्यत आयोजित करण्यावर बंदी असताना चांदगिरी येथे बेकायदेशीररीत्या बैल-घोड्यांची शर्यत घेणाऱ्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आवास प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना शर्यत आयोजकांनी मारहाण केल्याचाही प्रकार घडला असून, या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घोडा-बैलांच्या टांगा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. असे असतानाही नाशिक रोड परिसरातील चांदगिरी शिवारामध्ये घोडा आणि बैलांच्या टांगा शर्यतीचे आयोजन काल करण्यात आले होते. या टांगा शर्यतीची माहिती मुक्‍या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या आवास या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाली. त्यामुळे आवासचे प्राणिमित्र हे चांदगिरी शिवारात पोचले असता, त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून थाटामाटात टांग्यांची शर्यत सुरू होती. याबाबत आवासचे गौरव क्षत्रिय व त्यांच्या साथीदारांना शर्यतीतील घोडा-बैलांवर होत असलेल्या मारहाणीचे व शर्यतीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण सुरू केले. त्या वेळी संबंधितांनी त्यांना विरोध करीत वाद घातला. टांगा शर्यतीवर बंदी असतानाही सुरू असलेल्या शर्यतीला विरोध केल्याने संशयितांनी आवासच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण सुरू केली. "आवास'च्या पदाधिकाऱ्यांनी तेथून पळ काढून नाशिक रोड पोलिस ठाणे गाठले. 

Web Title: nashik news horse-bullock tanga race