रविवारी परीक्षा अन्‌ प्रतीक्षा दहा निकालांची 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक - भूक- तहान विसरून राज्यभरातील लाखो विद्यार्थी अथक परिश्रम घेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असतात. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या युवकांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. येत्या रविवारी (ता. 8) राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2018 नियोजित असताना 2017 मध्ये झालेल्या राज्यसेवा परीक्षेसह विविध दहा परीक्षांचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही. निकाल हाती नसल्याने यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनीही यंदाच्या परीक्षेसाठी अर्ज केला असून, यामुळे नवख्या तरुणांना संधीपासून मुकावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

आयोगाचा गलथान कारभार व इतर मागण्यांसाठी परीक्षार्थींकडून राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला नाशिकमधून सुरवात झाली होती. एक, दोन नव्हे तर तब्बल अकरा परीक्षांचे निकाल प्रलंबित होते. त्यापैकी सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. मात्र, अद्याप दहा परीक्षांचे निकाल राखून ठेवलेले आहेत. दुसरीकडे 2018 च्या परीक्षांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून, 2017 च्या परीक्षेत जे उत्तीर्ण होतील, ते 2018 च्या परीक्षेलाही असतील आणि उत्तीर्णदेखील होतील. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना संधीच मिळणार नसल्याचे दिसून येते. 

मुख्य परीक्षा, नंतर मुलाखतीला वेळ लागणार असल्याने परीक्षार्थी धोका पत्कारण्यापेक्षा 2018 च्या परीक्षा देतील. यामुळे त्यांना पैसा, वेळ खर्च करत पुन्हा परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तर, दुसरीकडे मुलाखतीची तयारी करायची, की 2018 च्या पूर्व परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे, असा यक्ष प्रश्‍न परीक्षार्थींपुढे असेल. वेळीच निकाल जाहीर करून हा गोंधळ टाळता आला असता, असे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. 

प्रलंबित असलेले निकाल व रिक्‍त जागांची संख्या 
राज्यसेवा 2017 -----------377 
पीएसआय 2016 ---------750 
पीएसआय 2017 ---------650 
साहायक कक्ष अधिकारी ------107 
राज्य कर निरीक्षक -----------250 
कर साहायक --------------296 
मंत्रालयीन लिपिक ----------495 
महाराष्ट्र वनसेवा 2017 ------42 
महाराष्ट्र कृषी सेवा -----------79 
अभियांत्रिकी सेवा ----------199

Web Title: nashik news MPSC Exam youth maharashtra