कांदा वधारला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक - देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला मागणी वाढत असल्याने कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांतील दर क्विंटलला 1400 पर्यंत वाढले. संपूर्ण आठवडाभर प्रतिक्विंटल 400 ते 1400 या दरम्यान स्थिर दर होते. देशातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठात कांद्याची आवक स्थिर असताना मागणी मात्र वाढली आहे. या स्थितीत दरातही वाढ झाली आहे. या स्थितीत येत्या काळातही हे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. 

नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या व 45 उपबाजारांत कांद्याची आवक होते. गत सप्ताहात सर्वच बाजार आवारांत कांद्याची आवक वाढली होती. खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीत भांडवलाची गरज असताना मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येत आहे. मात्र, या स्थितीत एकदम जास्त गर्दी न करता हळूहळू थोडा थोडा कांदा बाजारात आणणे योग्य ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Web Title: nashik news onion

टॅग्स