नाठाळ निरुपमांच्या माथी हाणा काठी!

प्रकाश पाटील
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

आपले जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देत असताना संजय निरुपम यांच्यासारख्या नाठाळांना दळभद्री विचार सूचतातच कसे. कॉंग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी "मेरा भारत महान‘ ही घोषणा दिली होती हे निरूपम विसरले. आपण देश म्हणून मोदींच्या मागे उभे रायचे की आपल्याच लष्करावर टीका करायची हे यांना का कळत नाही. यांची डोकी फिरली आहेत की काय?

आपले जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देत असताना संजय निरुपम यांच्यासारख्या नाठाळांना दळभद्री विचार सूचतातच कसे. कॉंग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी "मेरा भारत महान‘ ही घोषणा दिली होती हे निरूपम विसरले. आपण देश म्हणून मोदींच्या मागे उभे रायचे की आपल्याच लष्करावर टीका करायची हे यांना का कळत नाही. यांची डोकी फिरली आहेत की काय?

आपल्याकडे वाचाळ नेत्यांची वाणवा नाही. फक्त भाजपमध्ये नाही, तर कॉंग्रेसमध्येही असे दिवटे आहेतच की. मनात येईल ते काही बोलायचं म्हणजे बोलायचं आणि लोकाचं लक्ष वेधून घ्यायचं. आपण इतरांपेक्षा कसे शहाणे आहोत हे दाखवायचं. मुंबईसह देशभरात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आतापर्यंत बक्कळ दहशतवादी हल्ले करून आपल्या शेकडो निरपराध बांधवांचे आणि जवानांचे जीव घेतले आहेत. काश्‍मीर तर रोज जळतंय. रोज आपले जवान मरतायत. हे सगळं भयावह चित्र पाहून आपले लष्कर पेटून उठतंय. पण काय करणार? त्यांना आदेश पाहिजे असतो.

उरीतील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "पीओके‘त घुसून हल्ला केल्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली. सोनिया गांधींसह सर्वच पक्षांनी मोदींचे अभिनंदन करून सरकारला पाठिंबा दिला. आपलं राजकारण काहीही असेल पण जेंव्हा भारताचा विचार पुढे येतो तेंव्हा आपण सगळे एकच असलो पाहिजे. हाच विचार पुन्हा एकदा पुढे आला. पण, मुंबईतील कॉंग्रेसचा एक वाचाळ नेता संजय निरुपम यांनी शेवटी अकलेचे... जे तोडायचे ते तोडलेच. ते म्हणे, ""पीओके‘त दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केल्याचे केंद्राने पुरावे द्यावेत. ही कारवाईच बनावट आहे!‘
बघा ना, आपले जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देत असताना असले दळभद्री विचार या नाठाळांना सूचतातच कसे. कॉंग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी "मेरा भारत महान‘ ही घोषणा दिली होती. आपण देश म्हणून मोदींच्या मागे उभे राहायचे की आपल्याच लष्करावर टीका करायची हे यांना का कळत नाही. यांची डोकी फिरली आहेत की काय? प्रत्येक गोष्टीत किती राजकारण करायचे. यालाच लोक कंटाळतात आणि पुढाऱ्यांना शिव्या देतात. जसे निरुपम, तसेच केजरीवाल, तसेच ओम पुरी. हे सगळेच "व्हिलन‘ची भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत. या व्हिलनना लोळवण्यास जनता समर्थ आहे. देशाच्या मुद्यावर सर्वच देशभक्त (मोदीभक्त नव्हे) त्यांच्या पाठीशी आहेत हे ठणकावून सांगण्याची गरज आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते ना "नाठाळाच्या माथी, हाणा काठी‘
लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयींनी पाकला धडा शिकविला होता. आणि आता मोदीही धडा शिकवत आहेत. याचा आपणास अभिमान वाटला पाहिजे ना? तुम्ही तर शत्रू राष्ट्राचे हिरो होण्यात धन्यता कसली मानता? उगाच आपलं मनात येईल ते बोलता. निरुपम हे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष. मुंबईत कॉंग्रेसला यश कसं मिळेल ते बघा की राव. इथे पक्षाची बोंब आणि चर्चा करायची देशाची. बरं झालं भाजपपेक्षा कॉंग्रेसवाल्यांनी या नाठाळाला खडसावलं ते.
खरं तर लष्कर, लष्कराची कारवाई याविषयी तज्ज्ञ लोक बोलतील ना? आपण काही या विषयातील तज्ज्ञ नाही. पण भारत आणि पाकमध्ये काय चाललंय हे लोकांना कळतं ना. आपल्या महाराष्ट्रातील जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या गावात एकदा तरी जाऊन या निरुपम. त्या गावातील लोकांच्या पाकिस्तानविषयीच्या भावना कळतील तुम्हाला. सर्जिकल अटॅकविषयी असे वक्तव्य केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तुम्ही त्यांच्याच विजयाला हातभार लावत आहात. तुमच्या वक्तव्याचा कॉंग्रेसलाच अधिक फटका बसणार आहे, हे सांगण्याची गरज नाही. निवडणुकीचा प्रचार सुरू होऊ द्या, मग तुम्हाला समजेल तुमच्यावर कोण तुटून पडतेय ते. शिवसेना की भाजप! 

Web Title: Nasty nirupamam responsible staff!