National Farmers Day : आणि कॉन्स्टेबलने चक्क भारताच्या पंतप्रधानांना लाच मागितली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Farmers Day

National Farmers Day: ...अन् कॉन्स्टेबलनं चक्क भारताच्या पंतप्रधानांनाच मागितली होती लाच

National Farmers Day : 23 डिसेंबर म्हणजे भारताचा शेतकरी दिवस. आणि 23 डिसेंबर म्हणजे भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस.चरण सिंहांनी देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या योगदानाचं स्मरण करुन 2001 सालापासून देशात दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन साजरा केला जातो.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारी कुळीथ पिठी कशी तयार करायची?

आता भारताच्या प्रत्येक पंतप्रधानपदाचे किस्से ऐकिवात आहेत, असेच किस्से चरणसिंहांचे सुद्धा आहेत. त्यांना लोकनेता म्हटलं जायचं. त्यांच्या साधेपणामुळे आणि जनतेशी त्यांची जी नाळ जोडली होती, त्यामुळे ते चर्चेत असायचे.

हेही वाचा: Amazon Prime Gaming : Amazon ने भारतात लाँच केलं दमदार गेमिंग ॲप! आता गेम खेळा फ्री ऑफ कॉस्ट

चौधरी चरणसिंह यांच्याशी संबंधित असाच एक किस्सा आहे ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून 35 रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर जे रामायण घडलं ते सर्वच पोलिसांसाठी एक उदाहरण ठरलं होतं.

हेही वाचा: New Year Fashion Trend: न्यू इयर मध्ये असायलाच हवं असं चिकनकरी कुर्त्यांचं परफेक्ट कलेक्शन

चौधरी चरण सिंह यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडून आले. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं.

हेही वाचा: Christmas Fashion : या फॅशनेबल ड्रेसेसने करा क्रिएट आपला ख्रिसमस पार्टी लुक

त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1979 साली ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली.

हेही वाचा: Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार कसा तयार करायचा?

28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर देशाचे पंतप्रधान बनले. त्यावेळी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी चौधरी चरणसिंग यांना पत्र लिहून त्यांच्या समस्या मांडत होते. यातील बहुतांश समस्या पोलिस ठाणे आणि कंत्राटदारांच्या लाचखोरीच्या प्रकरणांशी संबंधित होत्या. असंच एकदा चरणसिंह इटावा जिल्ह्यातील उस्राहर पोलीस स्टेशनला पोहोचले. कारण त्यांना माहित होतं की समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी सामान्य माणसासारखंच वागलं पाहिजे.

हेही वाचा: Health Tips: हिवाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

चौधरी चरणसिंह इटावा जिल्ह्यातील उस्राहर पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचले. त्यांनी अंगात फाटलेला घाणेरडा कुर्ता आणि धोतर घातलं होतं. बैलांच्या चोरीची तक्रार करण्यासाठी ते या पोलीस ठाण्यात आले होते. पण पोलीस कर्मचार्‍याने त्यांचा रीपोर्टच लिहिला नाही. त्यानंतर टाळाटाळ करायला सुरुवात केली.

हेही वाचा: Love Life : ब्रेकअप नंतर काही लोक यशस्वी का होतात?

यानंतर पंतप्रधान उठले आणि निघू लागले, तेव्हा मागून एक शिपाई ओरडला की चहापाण्याचा खर्च दिला तर तक्रार नोंद करून घेऊ.पंतप्रधान आणि कॉन्स्टेबल यांच्यात बोलणं झालं आणि 35 रुपयांची लाच दिल्यावर रिपोर्ट लिहू असं ठरलं. रिपोर्ट लिहून झाल्यावर हवालदाराने विचारलं, 'सही करणार की अंगठ्याचा ठसा लावणार?'

हेही वाचा: Pregnancy Sex : गर्भावस्थेत सेक्सचा आनंद घ्यायचाय? या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

यावर चौधरी चरणसिंह म्हणाले की मी सही करीन, म्हणून कॉन्स्टेबलने तक्रारपत्र त्यांच्या हातात दिलं. चौधरी चरणसिंह यांनी पेन उचलला आणि अंगठ्याचा पॅडही उचलला. यानंतर त्यांनी कागदावर सही केली.

हेही वाचा: Health Tips: रोजचा येणारा मानसिक ताण कसा कमी करावा?

कॉन्स्टेबल काहीच बोलला नाही पण त्यानंतर चौधरी चरणसिंह यांनी खिशातून एक शिक्का काढून शाईच्या पॅडवर ठेवला. नंतर सहीच्या पुढे शिक्का मारला. कॉन्स्टेबलने त्या शिक्क्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर त्यावर पंतप्रधान, भारत सरकार असं लिहिलं होतं.हे बघून कॉन्स्टेबल घाबरला, त्याला दरदरून घाम फुटला.

हेही वाचा: Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

ही घटना समजताच संपूर्ण पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कडक कारवाई करत चौधरी चरणसिंह यांनी संपूर्ण उस्राहर पोलीस स्टेशनच सस्पेंड केलं.त्यांचे हे किस्से पाहिले की त्यांना दिलेली लोकनेता ही उपाधी सार्थ ठरते.

हेही वाचा: Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

चौधरी चरण सिंह यांना वाचणाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं.