नाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा

Natural-Gas
Natural-Gas

नाशिक - देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवारपासून देशातील १७४ शहरांत शुद्ध सुरक्षित नैसर्गिक गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. यात राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या या उपक्रमांतर्गत नाशिकचा समावेश आहे. त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीचे संचालक राजेश पांडे यांनी नुकताच नाशिक दौरा केला.

देशात २०३० पर्यंत कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रदूषण ३३ टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवत देशातील प्रदूषण नियंत्रण साध्य करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. पेट्रोल- डिझेलचे अवलंबित्व कमी करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. 
ग्राहकांना घरपोच शाश्‍वत गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पेट्रोल- डिझेलच्या तुलनेत २५ ते ३० टक्के स्वस्तात इंधनाची गरज पूर्ण करता येणार आहे.

सात जिल्ह्यांचा समावेश 
राज्यात पुण्यानंतर आता नाशिकसह राज्यातील धुळे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा, सांगली व नगर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांपैकी नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची भारत गॅस रिसोर्सेसकडे जबाबदारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com