#Navdurga नवरात्रीसाठी माहूरगड सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

माहूर (जि. नांदेड) - महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील (जि. नांदेड) श्री रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवाला बुधवारपासून सुरवात होत असून, तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (ता. 10) सकाळी घटस्थापना होईल. या वेळी श्री रेणुका मातेच्या जयघोषाने गड दुमदुमून जाईल.

संस्थानच्या विश्वस्थ समितीने दर्शनापासून भाविकांच्या सुरक्षेपर्यंतची व्यवस्था केल्याची माहिती तहसीलदार तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे कोशाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली. नऊ दिवसांत धार्मिक कार्यक्रमांसह संगीतसेवाही देण्यात येणार आहे. प्रतिपदा ते पंचमीदरम्यान सकाळी पाच ते सात तसेच सायंकाळी सहा ते सात पंडित नितीनजी धुमाळ यांचे सनईवादन होईल. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस श्री रेणुकादेवीला ऐतिहासिक मौल्यवान सुवर्णजडित दागिने घालण्यात येणार आहेत. यात सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, बोरमाळ, गहूमाळ, बांगड्या, लक्ष्मीहार आदी भाविकांना पाहायला मिळतील.

Web Title: Navdurga Navratrotsav Mahurgad