माझ्यावर नजर ठेवा, हालचाली ट्रॅक करा म्हणत मलिक परदेश दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

वानखेडे यांनी शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.

माझ्यावर नजर ठेवा, हालचाली ट्रॅक करा म्हणत मलिक परदेश दौऱ्यावर

गेली काही दिवस राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेड आणि मलिक या प्रकरणातील रोज नवे खुलासे समोर येत आहेत. नव्या खुलास्यांमुळे मुंबई हायकोर्टात मलिक विरुद्ध वानखेडे हे प्रकरण चांगलेचं गाजत आहे. दरम्यान आता नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा या प्रकराणाला वेगळे वळण मिळणार का यावर तर्कवितर्क सुरु आहेत.

हेही वाचा: जय किसान! लोकशाहीसमोर हुकुमशाही झुकली - जयंत पाटील

केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन मी दुबईला जात आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मी भारतात परत येईन. सर्व सरकारी संस्थांना विनंती करतो की, माझ्यावर नजर ठेवा आणि माझ्या हालचाली ट्रॅक करा असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

दरम्यान, वानखेडे यांनी शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. या गंभीर आरोपानंतर विरोधकांकडून मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका सुरु आहे. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असंही म्हटलं जात आहे. आता मंत्री मलिक यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: 2 दिवसांत 'गेम'; 'महाविकास'समोर 'भाजप'चे तगडे आव्हान

loading image
go to top