esakal | नितेश राणे...सावध राहा! तुमचेच लोक तुरुंगात जातील - नवाब मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

 Nitesh Rane

'नितेश राणे...सावध राहा! तुमचेच लोक तुरुंगात जातील'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणी (drugs party) सुरू असलेला प्रकरणाला धार्मिक वळण लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एक खान अडकल्यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) त्याची दखल घेत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला आहे. राणे यांनी ट्विट करत खान हे आडनाव असल्यामुळे त्याला पीडित ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण सुशांतसिंह राजपूत हिंदू असल्यामुळे त्याला ड्रग्जच्या आहारी गेल्याचं ठरवलं का? असा आरोप केला आहे. त्यावरूनच आता मंत्री नवाब मलिक यांनी नितेश राणे (nawab malik replied to nitesh rane) यांना सल्ला आहे.

हेही वाचा: देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर होणार सुरु

मला वाटतं भाजपने हे सर्व फ्रेम केलं आहे. भाजप नेते बोलतात, त्यामधून हे सिद्ध होत आहे. नितेश राणेंना माझा हाच सल्ला असेल की त्यांनी सावध राहावं. कधी तुमच्या घरात कोण घुसेल आणि तुमचेच लोक तुरुंगात जातील हे कळणार नाही. त्यामुळे नितेश राणेंना सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला नवाब मलिक यांनी नितेश राणेंना दिला आहे.

नितेश राणे यांनी नेमकं काय केलेय ट्विट?

नबाव मलिकांची आदळआपट का सुरू आहे? कारण तो खान आहे. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित आहे का? सुशांतसिंह राजपूत हिंदू होता म्हणून तो व्यसनाधीन झाला काय? असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहेत.

क्रुझची केस फर्जिवाडा - मलिक

आम्ही जागेवर पंचनामा करतो, असे दिल्लीचे एनसीबीचे अधिकारी म्हणत होते. रविवारी साडेआठ वाजता एनसीबीने काही फोटो व्हायरल केले होते. त्या फोटोत एका खुर्चीवर सीझर आहे. हे फोटो त्यांनी क्राईम रिपोर्टरला पाठवले आहेत. त्याचबरोबर एनसीबीने चुकीने एक व्हिडीओही पाठवला आहे. हे सीझर कारवाई केलेल्या जहाजावर नाही, टर्मिनलवर नाही. हे सिझर समीर वानखेडेंच्या टेबलवरचे आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेले पडदेही वानखेडेच्या कार्यालयातील आहे. त्यामुळे क्रुझची केस फर्जिवाडा आहे, असंही मलिक म्हणाले.

loading image
go to top