‘जलरागिणी’ नाजियाची दुष्काळमुक्तीसाठी धडपड

‘जलरागिणी’ नाजियाची दुष्काळमुक्तीसाठी धडपड

अकोला -  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हवे ते यशही पादाक्रांत करता येते, फक्त त्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्‍यकता असते, हे विचार आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणणारी नाजिया परवीन तकदीर उल्ला खान ही तरुणी दुष्काळाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे. त्यामुळेच दुष्काळमुक्तीसाठी लढणाऱ्या अवघ्या २६ वर्षांच्या नाजियासाठी जलरागिणी ही बिरुदावली सार्थ ठरली आहे.    

नाजिया ही सध्या भारतीय जैन संघटनेची क्षेत्रीय सन्वयक म्हणून काम पाहते आहे. दुष्काळमुक्तीचा आपला निर्धार प्रत्यक्षात आणण्यासाठी नाजियाने कंबर कसली आहे. 

नाजियाची एक बहीण डॉक्‍टर असून, दुसऱ्या बहिणीला स्काउट गाइडमध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. घरातील शैक्षणिक आणि समाजसेवेचे वातावरण नाजियाला स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळे अगदी शाळा- महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नाजियाने समाजसेवेचे व्रत हाती घेतले होते. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमासह इतरही अनेक मार्गांनी नाजियाने स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे. नाजियाच्या समाजिक कार्याची दखल घेऊन तिला आतापर्यंत १२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

सध्या नाजिया भारतीय जैन संघटनेशी संबंधित असून, दुष्काळ दूर करण्यासाठी ती जलरागिणी बनून खारीचा वाटा उचलत आहे.

अपूर्ण स्वप्न पूर्ण करा!
नाजियाला दुष्काळमुक्तीबरोबरच विधवा, घटस्फोटित महिला, गरीब कुटुंबांतील महिला-मुलींसाठी काम करायचे आहे. जगताना कोणतेच स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून महिला सक्षमीकरणासाठीही पाऊल उचलणार असल्याचे तिने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com