''समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीमच'', नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

Nawab malik-samir wankhede
Nawab malik-samir wankhedegoogle

मुंबई : मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (samir wankhede) यांच्यामधील वाद वाढतानाच दिसतोय. नवाब मलिकांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो आणि जन्माचा दाखला ट्विट केल्यानंतर वानखेडेंनी त्यावर स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही नवाब मलिक आपल्या दाव्यावर ठाम आहेत. ''समीर वानखेडे हे १०० टक्के मुस्लीम आहेत. आजदेखील मुस्लिम आहेत आणि कालपण होते. एका मशिदीत जाऊन ते भाषण करतात.'' असं मलिक म्हणाले.

Nawab malik-samir wankhede
''माझे वडील हिंदू, तर आई...'' मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा
Nawab malik-samir wankhede
आर्यन खान प्रकरण : प्रभाकर साईलच्या गंभीर आरोपानंतर NCB चं स्पष्टीकरण

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट करत ''समीर दाऊद वानखेडे यहां से शुरू हुआ फर्जीवाडा'' असे म्हटले होते. त्यानंतरही ते त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. समीर दाऊद वानखेडे यांचा जन्माचा दाखला मी प्रसिद्ध केला असून त्यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागले. दाऊन वानखेडे यांनी धर्मांतर केल्यानंतर नाव बदललं होतं. त्याच्याआधारे धर्माचा दाखला काढण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये खाडाखोड करण्यात आली. तेव्हापासून ही बोगसगिरी सुरू झाली आहे. समीर वानखेडे हे मशिदीमध्ये जाऊन भाषण करतात. एखाद्या मौलानापेक्षा जास्त धार्मिक विषय ते सांगतात. त्यांनी बोगसगिरी केली असून नोकरीसाठीही बोगस दाखला काढला आहे. याबाबत आणखी कागदपत्रे समोर आणणार आहे'' असं नवाब मलिक एका माध्यमासोबत बोलताना म्हणाले.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या आरोपांवर खुलासा केला असून वडील हिंदू आणि आई मुस्लिम असल्याचे सांगितले आहे. तसेच पहिल्या लग्नाबद्दल देखील त्यांनी खुलासा केला असून डॉ. शबाना यांच्यासोबत पहिलं लग्न झालं होतं. मात्र, २०१७ मध्ये आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर क्रांती रेडकर हिच्याशी लग्नगाठ बांधली होती, असेही त्यांनी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com