Rahul Gandhi News : इंदिरा गांधी यांच्यासोबतही सरकार असंच वागलं होतं, त्यानंतर…; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं | NCP ajit Pawar on Indira Gandhi over rahul gandhi disqualified as member of lok sabha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ajit Pawar

Rahul Gandhi News : इंदिरा गांधी यांच्यासोबतही सरकार असंच वागलं होतं, त्यानंतर…; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मोदी आडनाव मानहानी प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. आज लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करत याबद्दलची माहिती दिली आहे. यानंतर याचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील याचा निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. (Rahul Gandhi disqualified)

अजित पवार काय म्हणाले..

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अजित पवार म्हणाले की, लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते महोम्मद फैजल यांची खासदारकी देखील अशीच रद्द करण्यात आली होती.

आज राष्ट्रीय नेते राहुल गांधी याच्याबद्दल असाच निर्णय दिला. वास्तविक मतमतांतर, वैचारिक भूमिका वेगळी असू शकते पण, देशाला स्वतंत्र्य मिळालं तेव्हापासून कोणाची खासदारकी काढून घेतल्याचे मला आठवत नाही. हे संविधान आणि लोकशाहीत बसत नाही, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. तो घटनेने त्यांना दिला आहे. लोकसभेने घेतलेला आजचा निर्णय लोकशाहीला धक्का देणार आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

हे आपल्या शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात ज्यांनी आपल्याला घटना विचार दिले हे त्यात बसत नाही, हे का घडतंय कळत नाही असे अजित पवार म्हणाले.

जनता सगळं बघते आहे. राज्यकर्ते असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं या परंपरेला तिलांजली दिली जात आहे.

इंदीरा गांधी यांच्याबद्दलही सरकार हेच केलं होतं…

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मागे जर पाहिलं तर इंदीराजींबद्दल देखील असंच त्यावेळचं सरकार जरा वेगळ्या पध्दतीने वागलं. ते भारतातील जनतेला अजिबात आवडलं नाही. आणीबाणीच्या निमीत्ताने १९७७ साली पराभूत केलं होतं त्याच इंदीराजींना १९८० साली प्रचंड बहुमाताने देशाच्या पंतप्रधान बसवण्याचं काम देशाच्या जनतेने लोकशाही पध्दतीने मतदानाच्या माध्यमातून केलं. हे आपण त्याकाळात पाहिलं आहे. आता देखील ज्या घटना घडत आहेत त्या सर्वसामान्यांना आवडणाऱ्या नाहीयेत असे अजीत पवार यावेळी म्हणाले.

प्रकरण काय आहे

राहुल गांधी यांनी मोदी आडनाव मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असेत असे राहुल गांधी म्हणाले होते. या प्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.