
'गोप्याला आवर घाला, नाहीतर आम्हाला आवरणे कठीण होईल'; अजित पवारांवरील टीकेनंतर मिटकरी आक्रमक
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत असून अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आक्रमक झाला आहे. आमदार आमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. पडळकरांना आवरा नाहीतर आम्हाला आवरणे कठीण होईल, असं ते म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या व घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल.'
अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाही. त्यामुळे त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच नाही. ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. अजित पवारांबाबतची आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे, असं भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
आंदोलन
उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या मंगळसुत्र चोराविरुद्ध मदनलाल धिंग्रा चौक अकोला येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.गृहमंत्री देवेंद्रजींनी याला तात्काळ आवर घालावा नाहीतर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ, असं मिटकरी म्हणाले. (Latest Marathi News)