#Boycott_KBC_SonyTv महाराजांचा एकेरी उल्लेख; सोनीविरुद्ध रस्त्यावर उतरत निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मुंबई : सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज दुपारी 12 वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.

मुंबई : सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज दुपारी 12 वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.

बच्चनजी, तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करु शकता?

सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून याचा निषेध म्हणून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Image may contain: 1 person, text

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सदरबाबीचा निषेध करण्यासाठी आज सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या मालाड येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?
बुधवारी कार्यक्रमादरम्यान गुजरातच्या स्पर्धकासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा होता. ''यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औंरगजेबचा समकालीन होता?'' या प्रश्नासाठी देण्यात आलेले चार पर्याय असे होते-
1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3.  महाराजा रणजीत सिंह 
4. शिवाजी

यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने आता चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे मुघल सम्राट अशी पद्वी लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. 

ट्विटरवर #Boycott_KBC_SonyTv सुरु
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी आता सोनी टीव्हीवर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. सोशल मीडियावर #Boycott_KBC_SonyTv हा ट्रेंड सध्या पहिल्या क्रमांकावर आहे आणि मार्फत चाहत्यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and people from Maharashtra asks to boycott KBC and Sony Tv for Disrespecting Shivaji Maharaj