शरद पवारांच्या गाडीतील 'ती' व्यक्ती कोण?; चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

शरद पवार यांच्या बाजूला बसलेली ही व्यक्ती नेमकी कोण होती, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटवर हे सर्वजण गेल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी याच ठिकाणी अजित पवारही गेले होते. त्यामुळे बहुमताचा विश्वास असलेल्या महाविकासआघाडीला यामुळे बळ मिळाले आहे की काय, असा प्रश्न आहे.

मुंबई : विधानभवनात उद्या (बुधवार) होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानातून त्यांच्या गाडीत त्यांच्यासोबत कोण व्यक्ती होता आणि त्याने कॅमेऱ्यासमोर तोंड का लपविले यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

(सौजन्य - टीव्ही 9)

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सोमवारी रात्री उशिरापर्यंत नेते मंडळी सक्रिय होती. रात्री एक वाजताच्या सुमारास शरद पवार यांची गाडीत सुप्रिया सुळे यांच्या गाडीत पवारांशेजारी बसलेला व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येताच तोंड लपविले. यावेळी पवारांच्या गाडीत तोंड लपवणाऱ्या एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं. शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी हे चित्र पाहायला मिळाले. 

काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात; खर्गेंची घोषणा

शरद पवार यांच्या बाजूला बसलेली ही व्यक्ती नेमकी कोण होती, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटवर हे सर्वजण गेल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी याच ठिकाणी अजित पवारही गेले होते. त्यामुळे बहुमताचा विश्वास असलेल्या महाविकासआघाडीला यामुळे बळ मिळाले आहे की काय, असा प्रश्न आहे. अजित पवारांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडीत काय ट्विस्ट येतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अजित पवारांना क्लिन चिट मिळणं आणि जनतेच्या मनात येणं - खडसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar and Supriya Sule meet Shivsena and Congress leaders