माझ्या विधानाचा विपर्यास - पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 एप्रिल 2019

वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले होते. मात्र, माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमध्यमांना दिले. 

मुंबई - वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले होते. मात्र, माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमध्यमांना दिले. 

शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईत मतदानाचा हक्क बजाविला. या प्रसंगी त्यांच्यासोबत कन्या सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. मतदानानंतर शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. यासाठी संसदेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाठविणे गरजेचे आहे. वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे वृत्त रविवारी प्रकाशित झाले होते; त्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांचे नाव घेतले. पण, वृत्तपत्राने छापलेल्या मुलाखतीत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे शरद पवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar clarified that my statement was misplaced