esakal | अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटत आहेत, हे मला माहिती नाही. मी दुसऱ्या कामात आहे. कोणासोबत जाणे हा व्यक्तिगत निर्णय नसतो आणि पक्षाचा निर्णय असतो. हकालपट्टी करणे हे पक्ष ठरवत असतो. अशा गोष्टी मी अनेक वर्षे पाहिल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग निघतो.

अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. पक्षाची आगोदर बैठक झाली, त्यामध्ये पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सरकार बनणार हे स्पष्ट करण्यात आले होते. या बैठकीला अजित पवारांसह सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी आता घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी शरद पवार प्रितिसंगम येथे आले होते. राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीने याच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. आज पवारांनी पत्रकार परिषदेत याविषयी स्पष्टीकरण दिले.

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

शरद पवार म्हणाले, की राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटत आहेत, हे मला माहिती नाही. मी दुसऱ्या कामात आहे. कोणासोबत जाणे हा व्यक्तिगत निर्णय नसतो आणि पक्षाचा निर्णय असतो. हकालपट्टी करणे हे पक्ष ठरवत असतो. अशा गोष्टी मी अनेक वर्षे पाहिल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग निघतो. महाविकासआघाडी एकवाक्यता आहे. आमचे सरकार येईल, यात शंका नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. आम्ही इतरांच्यापेक्षा वेगळे आहोत. केंद्रातील सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करुन, राज्यपालांनाही भ्रमात ठेवले गेले. सत्ता काबीज करण्याचा वेगळेपणा भाजपने दाखविला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही सरकार बनवले गेले. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. बहुमत नसताना नवे सरकार आले. 

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 

loading image