राज ठाकरेंना खर्च मागण्याचे कारण काय? : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढविता लोकसभेच्या प्रचार सभा घेतल्याने आयोगाने त्यांना खर्चाचा तपशील देण्याबाबत नोटीस बजाविली आहे. यावर आज "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगावरच टीका केली.

1977 ला आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत यांच्यासारख्या अराजकीय नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. त्या वेळी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे खर्च मागितला नव्हता. याचा दाखला देत राज ठाकरे यांना सभांचा खर्च मागण्यांचा अधिकारच काय? असा सवाल शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला केला. 

आणीबाणी हे देशावरचे संकट होते म्हणून तेव्हा पु. ल. देशपांडे यांनी देशहितासाठी कॉंग्रेसविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता राज ठाकरे यांना देशावर काही संकट दिसत असल्याने त्यांनी कोणाला मत द्यावे अथवा कोणाला देऊ नये, हे सांगण्यासाठी सभा घेण्याचा अधिकार आहे. राज यांच्या पक्षाने निवडणूक लढविली नाही. त्यांनी कोणत्याही उमेदवाराचे नाव घेऊन प्रचार केलेला नाही. त्यामुळे त्यांना सभांचा खर्च मागण्याचे कारणच काय? हे कळत नसल्याचे पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com