पोलिस खात्यात महिलांवर विश्वासाने जबाबदारी द्यायला हवी : शरद पवार

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मुंबई : ''पोलिस खात्यातील महिलांवर विश्वासाने जबाबदारी दिली जात नाही. फक्त बंदोबस्तासारखी कामे दिली जातात. त्यांना मोठी जबाबदारी का दिली जात नाही? जबाबदारी दिली तर त्यांच्या क्षमतेत वाढ होईल. कर्तृत्वात कमतरता नसूनही महिलांना संधी न देण्याचे काम आपण करतो. यात सामूहिक बदल घडणे गरजेचे आहे'', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) सांगितले. 

पवार म्हणाले, ''धोरणात्मक व कार्यात्मक नीती संसद आणि विधिमंडळामध्ये ठरते. संकटकाळात जनतेने केलेल्या मागणीला होकार देण्याचे काम राजकीय पक्ष जलद गतीने करतात. महिला धोरणाचा 25 वर्षांचा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महिला आरक्षणाच्या बाबतीत वाटचाल करण्याची गरज आहे. पोलिस खात्यातील महिलांवर विश्वासाने जबाबदारी दिली जात नाही. फक्त बंदोबस्तासारखी कामे त्यांना दिली जातात. मोठी जबाबदारी का दिली जात नाही? जबाबदारी दिली तर त्यांच्या क्षमतेत वाढ होईल''.

तसेच ते पुढे म्हणाले, "प्रॉपर्टी अधिकारांची अंमलबजावणीही योग्यप्रकारे होत नाही. त्याला कारणीभूत महिलाही आहेत. कौटुंबिक कलह होऊ नये, असा विचार महिला करतात. वडिलांना मानसिक त्रास होऊ नये, भावाच्या नात्यात कटुता येऊ नये, अशी अनेक कारणे त्यामध्ये आहेत. महिलेनेही ठामपणे उभे राहून विचारात बदल करण्याची गरज आहे''.

Web Title: NCP Chief Sharad Pawar talked about women in Police Department