राज्यात आघाडीचे 45 जागांवर एकमत 

Congress-Ncp
Congress-Ncp

राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टींना जागा; मनसेसोबत युतीचा प्रश्‍नच नाही 
मुंबई - कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेच्या 48 पैकी 45 जागांवर एकमत झाले असून, उर्वरित तीन मतदारसंघांत मित्रपक्षांसाठीची बोलणी सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तर, राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघ सोडण्याचा निर्णय झाला असून, कॉंग्रेस डाव्या पक्षांसोबत इतर जागांसाठी चर्चा करेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

आगामी लोकसभा निवडणुका कॉंग्रेस- राष्ट्रवादीने एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांच्या राज्यातील नेत्यांच्या बैठकीत 40 जागांवर सहमती झाली होती. मात्र, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवार यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पेच असलेल्या पाच जागांवर तोडगा निघाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नसल्याचा खुलासाही शरद पवार यांनी केला. त्यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने ते भेटायला आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉंग्रेस इतर समविचारी पक्ष व डाव्या पक्षांसोबत आघाडीत समाविष्ट होण्याची चर्चा करत आहे. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉंग्रेसकडे असलेल्या वर्धा लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. मात्र, कॉंग्रेससाठी वर्धा मतदारसंघ महत्त्वाचा असून, राहुल गांधी यांनी मागील वर्षी 2 ऑक्‍टोबरला वर्धा येथे राष्ट्रीय कार्यकारिणी घेतल्याने या मतदारसंघासोबत कॉंग्रेसचे भावनिक नाते असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडण्याची शक्‍यता कमी आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी इतर दोन ते तीन समविचारी पक्षांसोबत चर्चा करत असून, लवकरच त्यांना देण्यात येणाऱ्या लोकसभा मतदारसंघांबाबत निर्णय होण्याचे चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com